
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। लागवड ते बाजारपेठेपर्यंतचा पीक सल्ला, हवामान अंदाज, कीड-रोग यांची ओळख व उपाययोजना, बाजारभाव, महाडीबीटी आधारित योजना, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अनुदान आदी माहिती असलेले ‘महाविस्तार एआय’ मोबाईल ॲप कृषी विभागाकडून बनविण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल मित्र असलेल्या या ॲपवरील माहितीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन भोर तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी केले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळत नसल्यामुळे पेरणी, फवारणी, काढणी यांसारख्या कामांमध्ये अनिश्चितता निर्माण होते. मात्र, या ॲपद्वारे मिळणारा हवामानाचा अंदाज उपयुक्त ठरतो. पिकाचा फोटो अपलोड करताच क्षणार्धात रोग निदानासह उपचारांचे मार्गदर्शन मिळते. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, पावसाचा अंदाज यांसह बाजारभावाबाबत उपयुक्त माहिती ॲपद्वारे मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु