सोलापुरात विविध भागांत तीन ते पाच दिवसांआड पाणी
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। सध्या उजनीवरील जुन्या जलवाहिनीचा एक पंप आणि समांतर जलवाहिनीच्या पंपाद्वारे शहरासाठी पाणी उपसा केला जातो. पण, अंतर्गत जलवाहिनी व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्र न झाल्याने सोलापूर शहराला सध्या तीन, चार व पाच दिवसांआड
सोलापुरात विविध भागांत तीन ते पाच दिवसांआड पाणी


सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

सध्या उजनीवरील जुन्या जलवाहिनीचा एक पंप आणि समांतर जलवाहिनीच्या पंपाद्वारे शहरासाठी पाणी उपसा केला जातो. पण, अंतर्गत जलवाहिनी व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्र न झाल्याने सोलापूर शहराला सध्या तीन, चार व पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटींची समांतर जलवाहिनी टाकण्यात आली. समांतर जलवाहिनीचे पाणी पाकणी येथे शुद्ध करून नागरिकांना देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी पाकणी हद्दीतील वनविभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी लागणार आहे. त्या जागेची पाहणी दिल्लीतील वनविभागाच्या पथकाने नुकतीच केली आहे. आता त्यांच्याकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र झाल्यावर पाणीपुरवठ्याचा एक दिवस कमी होऊ शकतो.दुसरीकडे, शहरांतर्गत जलवाहिनी व पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम झाल्यास संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणी शक्य आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेकडून ८९२ कोटींची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो विषय आता नगर विकास विभागाकडे असून, त्याला मंजुरी अपेक्षित आहे. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांचाही पाठपुरावा सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande