रत्नागिरी : राजापूर तालुक्यात ४२ हजार ३७६ जणांची तपासणी
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुका आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेत ४२ हजार ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून एकही कुष्ठरुग्ण आढळलेला नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही
रत्नागिरी : राजापूर तालुक्यात ४२ हजार ३७६ जणांची तपासणी


रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुका आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेत ४२ हजार ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून एकही कुष्ठरुग्ण आढळलेला नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

कुष्ठरोगाबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी तालुक्यात ११५ आरोग्य पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण, लक्षणांची पडताळणी आणि नागरिकांशी संवाद साधला जात आहे.

जिल्ह्यात शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोहिमेची अंमलबजावणी केली जात असून, तालुक्यातील दीड लाख लोकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. विशेषतः जोखीमग्रस्त आणि दुर्लक्षित भागांतील नागरिकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

कुष्ठरोग ओळख, प्रसार रोखणे आणि सामाजिक भेदभाव कमी करणे हा मोहिमेचा मुख्य हेतू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तपासणी आणि सर्वेक्षण पुढेही सुरू राहणार असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande