मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची व घरपोच मतदान सुविधा सुरू करण्याची मागणी!
अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यात नुकत्याच प्रकाशित झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत असलेल्या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी घरपोच टपाल मतदानाची सुविधा सुरू करण्याच्या मागणीसा
प


अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यात नुकत्याच प्रकाशित झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत असलेल्या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी घरपोच टपाल मतदानाची सुविधा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे निवेदन सादर करण्यात आले.

महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी आणि प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदवली गेली आहेत, अनेक मतदारांची नावे याद्यांमधून वगळली गेली असून पत्ते व इतर वैयक्तिक तपशीलांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आढळतो आहे. इतक्या गंभीर त्रुटींनंतरही सुधारणा प्रक्रियेस केवळ ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, जो अत्यंत अपुरा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे—

1. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी किमान २१ दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात यावी,

किंवा

2. सद्याची मतदार यादी प्रक्रिया स्थगित करून सर्व त्रुटींची सखोल तपासणी केल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात यावी.

निवेदनाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यात भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४०% पेक्षा जास्त दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेली घरपोच टपाल मतदान (होम व्होटिंग) सुविधा महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. ही सुविधा सुरू झाल्यास ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सोयीस्करपणे मतदान करता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रसंगी सैयद युसूफ अली (कार्याध्यक्ष), देवा भाऊ ताले (कार्याध्यक्ष), मेहमूद खान पठाण (विधानसभा अध्यक्ष), अमन घरडे (महानगर प्रसिद्धी प्रमुख), साफिक उर्फ पप्पू भाई, अल्ताफ खान, चंदू भाई, इंजिनिअर राजिक खान आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande