छ. संभाजीनगर : अंबादास दानवे वैजापूर तालुक्याचा दौऱ्यावर
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे .याचाच एक भाग म्हणून ते वैजापूर तालुक्यातील श
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे .याचाच एक भाग म्हणून ते वैजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करीत आहेत.

अंबादास दानवे यांनी वैजापूर तालुक्यातील महालगाव, घायगांव, वांजरगाव, लासूरगाव, वाकला, बोरसर, शिवूर व सवंदगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्व जिल्हा परिषदांची गट निहाय माहिती घेत राजकीय स्थिती जाणून घेतली. याप्रसंगी विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, मनोज गायके पाटील, विठ्ठल डमाळे पाटील, अक्षय साठे पाटील, सचिन तायडे व रमेश सावंत उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande