
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषद आमदार संजय केनेकर यांनी म्हाडा – मराठवाडा विभागीय कार्यालयास भेट देऊन महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत विभागीय अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय कामकाजाची सद्यस्थिती सर्वसामान्य नागरिक, गाळेधारक, लहान व्यापारी आणि सदनिका धारक यांच्या प्रलंबित मागण्या गृहनिर्माण प्रकल्पांवरील अडथळे व आवश्यक सेवा-सुविधा प्रलंबित फाईल्स, मंजुरी प्रक्रिया आणि स्थानिक स्तरावरील विविध प्रश्न या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित विषयांचा त्वरित आणि कार्यक्षम तोडगा निघावा, यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक ताशेरे व दिशा-निर्देश देण्यात आले. सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, आणि गृहनिर्माण व्यवस्थेत पारदर्शकता व गती आणणे—हीच माझी ठाम कटिबद्धता असल्याचे आमदार केनेकर यांनी सांगितले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis