
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना व रिपाई (आठवले गट) महायुतीच्या च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.आशाताई एकनाथ माळी तसेच नगरसेवक पदासाठीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे मारोतीराया चरणी नारळ वाढवून संपन्न झाला. तसेच मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ देखील करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थित सर्वाशी संवाद साधत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.आशाताई एकनाथ माळी तसेच नगरसेवक पदासाठीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. देशातील व राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. असे त्यांनी सांगितले
याप्रसंगी खा.भागवत कराड, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार श्री. कैलास गोरंटयाल, श्री. भास्कर आबा दानवे, माजी जि.प. सदस्या सौ. आशाताई पांडे, श्री. सुरेश बनकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नगरपरिषदेचे सर्व उमेदवार आणि असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis