बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे - मेघना बोर्डीकर
परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने गंगाखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांची बैठक घेतली. देशातील व राज्यातील सरकार ज्या मजबुतीने काम करत आहे त्यामुळे जनता आपल्या सोबत आहेच पण आपणही “मेरा बूथ सबसे मजबूत” हा मंत्र
नगरपरिषद निवडणूक


परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने गंगाखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांची बैठक घेतली. देशातील व राज्यातील सरकार ज्या मजबुतीने काम करत आहे त्यामुळे जनता आपल्या सोबत आहेच पण आपणही “मेरा बूथ सबसे मजबूत” हा मंत्र घेऊन प्रत्येकाने काम केले तर या निवडणुकांत भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळेल हा विश्वास व्यक्त केला. बूथ प्रमुखांनी सतर्क राहून, जनसंपर्क वाढवत आपल्या प्रभागातील उमेदवार विजयी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

गंगाखेड नगरपरिषदेवर सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करत भाजपाचा झेंडा फडकवणारच हा निर्धार यावेळी उपस्थित बूथ प्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande