स्व. डॉ. रमेश गोडबोले हेच खरे सिद्धात्मा- जितेंद्रनाथ महाराज
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। कसे जगावे, कशासाठी जगावे, याची जाणीव डॉ. रमेशपंत गोडबोले यांनी आपल्या जगण्यातून समाजाला करून दिली. मरावे परि किती रूपी उरावे, अशी शिकवण आजच्या पुरस्कार सोहळ्यातून होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात संतरूपी धन्वतंर
प.पू सद्‌गुरू आचार्य श्री १००८ स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांचे आशीर्वचन  समाजाप्रति समर्पित सेवा करणारे स्व. डॉ. रमेश गोडबोले हेच खरे सिद्धात्मा


अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। कसे जगावे, कशासाठी जगावे, याची जाणीव डॉ. रमेशपंत गोडबोले यांनी आपल्या जगण्यातून समाजाला करून दिली. मरावे परि किती रूपी उरावे, अशी शिकवण आजच्या पुरस्कार सोहळ्यातून होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात संतरूपी धन्वतंरी स्व. डॉ. रमेश गोडबोले यांनी संपूर्ण आयुष्य देव, देश आणि समाजाला समर्पित केले होते. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या याच निःस्वार्थ कार्यामुळे भगवंताने त्यांचेकडून अनेक सामाजिक कार्य करून घेतले. कोणालाही न सांगता अनेकांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. साधी राहणीमान, साधे विचार आणि समाजाप्रति समर्पित सेवा कार्य करणारे स्व. डॉ. रमेश गोडबोले खरे सिद्धात्मा होते. दुरितांचे तिमीर दूर करणाऱ्या कार्याला बळ मिळाले. असे आशीर्वचन अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे पिठाधीश्वर, अनंत विद्याविभूषित प.पू सद्गुरू आचार्य श्री १००८ स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी दिले. स्व. डॉ. रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्कार सोहळा स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे सायं.६ वा. आयोजीत करण्यात आला होता.

रमेश गोडबोले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून स्व. डॉ. अमृतक्क्ता विवेक घळसासी उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर सत्कारमुर्ती प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश देशपांडे उपस्थित होते. प्रज्ञा प्रबोधिनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाचा डॉ. रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्काराने प्रज्ञा प्रबोधिनी संस्थेला सन्मानित करण्यात आले.तसेच विवेक घळसासी म्हणाले, स्व. डॉ. रमेश गोडबोले स्मृती सेवा पुरस्कार केवळ सोहळा नसून तो समाजाकरीता दिशादर्शक ठरला आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या समाजातील प्रत्येक क्षेत्रात तमस वाढविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. नैतिक मुल्यांच्या अधयतनामुळे समाजामध्ये अंधकार आणि चिंता वाढते अशी चर्चा आणि चित्र दिसत आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमित आरोकर यांनी केले. श्री विवेकानंद छात्रावासाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या पसायदानाने या पुरस्कार सोहळ्याचा समारोप झाला. यशस्वीतेसाठी अनंत कौलगीकर, अभय देव, उदय पर्वतकर, राहुल कुलकर्णी, अतुल गायगोले, जोशी, शैलेश वानखेडे, अनंत जोशी, रवींद्र देशपांडे, मिलिंद देशपांडे, कार्तिक गद्रे, विकास खंडार, महेश शेंडे, मोहित खासबागे, संजय जोशी, पवन तावडे यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande