नाशिक : चिन्ह, अनुक्रमांक नसल्याने उमेदवार सापडले अडचणीत; प्रचारासाठी अवघे पाच दिवस
नाशिक, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। निवडणूक आयोगाने केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता उमेदवार आहेत. पण पक्षीय उमेदवार अनुक्रम नंबर नसल्यामुळे अडचणीत आहेत. तर अपक्ष उमेदवार नंबरही नाही आणि चिन्हही नाही त्यामुळे अडचणीत सापड
चिन्ह आणि अनुक्रमांक नसल्याने उमेदवारांचा निघतोय घाम,   प्रचारासाठी मिळणार अवघे ५ दिवस


नाशिक, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। निवडणूक आयोगाने केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता उमेदवार आहेत. पण पक्षीय उमेदवार अनुक्रम नंबर नसल्यामुळे अडचणीत आहेत. तर अपक्ष उमेदवार नंबरही नाही आणि चिन्हही नाही त्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पाच दिवसात प्रचार कसा करायचा असा प्रश्न उमेदवारांसमोर पडला आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, नव्याने स्थापन झालेली पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर भगूर त्रंबकेश्वर या नगरपालिकांचा समावेश आहे. या ठिकाणी आता प्रचाराचे वारे वाहत आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनी विविध ठिकाणी पॅनल निर्मिती करत कंबर कसली आहे. पक्षीय उमेदवारांनी आपापल्या प्रचारपत्रकांवर पक्ष चिन्ह टाकून प्रचार सुरू ठेवला आहे.

पण निवडणूक आयोगाने ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारांची दमछाक होत आहे. २१ नोव्हेंबर रोजी माघारी झाल्यानंतर लगेच पक्षाचे चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक कार्यक्रमात २६ तारखेला पक्षचिन्ह आणि अनुक्रमांक देणार असल्याने तोपर्यंत उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 26 तारखेला पक्ष चिन्ह आणि अनुक्रमांक मिळाल्यानंतर लगेच त्याच दिवशी प्रचारपत्रके मिळावीत, यासाठी उमेदवारांनी सर्व डिझाइन तयार करून ठेवली आहे. केवळ अनुक्रमांक टाकून तातडीने प्रचारपत्रके छापून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ३० तारखेला संध्याकाळी प्रचार संपणार असल्याने अनुक्रमांक आणि निशाणीसह मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना केवळ पाच दिवस मिळणार असल्याने मोठी धावपळ होणार आहे.

एकूणच काय तर निवडणूक आयोगाने ठरवलेल्या चुकीच्या कार्यक्रमांमुळे फक्त प्रचाराला पाच दिवसाचा कालावधी मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांची पुरती दमछाक सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande