
चंद्रपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक, प्रादेशिक कार्यालय चंद्रपुर अंतर्गत शासनाच्या निर्देशनानुसार खरीप पणन हंगाम 2025-26 साठी 3 नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू झाली आहे. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा व पोंभुर्णा या 8 तालुक्यातील एकूण 33 खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येत आहे.
यात नवखळा, मोहाडी मो., सावरगांव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगांव, जिवनापूर, गोविंदपूर , वाढोणा, तांबेगडीमेंढा, लाढबोरी, मुरमाडी, कळमगांव गन्ना, शिवणी, गडबोरी, नाचनभट्टी, पेठगांव, चारगांव बु., वडधा तु. भटाळा, डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव देश, मासाळ, टेकेपार, मोटेगाव, चंदनखेडा, पोंभुर्णा टिडीसी, करंजी, चिंचोली या केंद्रांचा समावेश आहे.
खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये ऑनलाईन नोंदणी व धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच आ.वि.क. सह. संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून ई-पिक पेरा केलेला सातबारा, नमूना 8 अ. आधारकार्ड ई – केवायसी केलेले बँक पासबुक, संमतीपत्र व इतर आवश्यक दस्तावेज घेवून स्वतः हजर राहावे व ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच धान विक्री करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक व्यवस्थापक म.रा. सह. आदि. विकास महामंडळ यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव