
नांदेड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत अ मध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत होते.
सदर कार्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, इमारत ब मध्ये दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे. तरी संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis