अमरावती- अपघातानंतर केमिकल टँकरने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)मध्यप्रदेशातून अकोला येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा माहुली जहागीर गावानजीक मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान अपघात झाला आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करत काही मिनिटांतच संपूर्ण टँकरचा कोळसा झाला. या अग्न
अग्नीतांडव:अपघातानंतर केमिकल टँकरने घेतला पेट,क्षणार्धात झाला कोळसा  माहुली जहागीर येथील घटना,सुदैवाने जीवित हानी टळली


अग्नीतांडव:अपघातानंतर केमिकल टँकरने घेतला पेट,क्षणार्धात झाला कोळसा  माहुली जहागीर येथील घटना,सुदैवाने जीवित हानी टळली


अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)मध्यप्रदेशातून अकोला येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा माहुली जहागीर गावानजीक मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान अपघात झाला आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करत काही मिनिटांतच संपूर्ण टँकरचा कोळसा झाला. या अग्नितांडवमुळे माहुली जहागीर परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चमूने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मध्यप्रदेश येथून अकोला येथे केमिकल घेऊन जात असतांना माहुली जहागीर गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने टँकरचा अपघात होऊन टँकर पलटी झाला आणि क्षणात टँकरने पेट घेतला. चालकाने चातुर्य व प्रसंगावधान दाखवत तात्काळ वाहनाबाहेर उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. टँकरमध्ये केमिकल असल्याने अग्नितांडव आणखी वाढण्याची शक्यता होती. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चमूने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे प्रमाण तीव्र असल्याने दलाला मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसताच माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी एमआयडीसी मार्गे वाहतूक वळवून महामार्गावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी केली आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पेटत्या टँकरचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत होती, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत सर्वांना सुरक्षित अंतरावर ठेवले.घटनेची पोलिसांनी नोंद घेतली घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य”

टँकरला आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचलो. धूर व ज्वाळांमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक होती, त्यामुळे वाहतूक तातडीने एमआयडीसी मार्गे वळवून महामार्गावरील कोंडी नियंत्रणात आणली. नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता होती. त्यामुळे घटनास्थळाजवळ जमलेली गर्दी दूर करून परिसर सुरक्षित करण्यात आला.

श्रीकांत कडू

सहाय्यक पोलीस निरीक्षक

पोलीस स्टेशन माहुली जहागीर

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande