सोलापूर : अतिवृष्टी- महापुरातील बाधितांमधील अद्याप एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराला आता दोन महिने उलटले. दिवाळीही संपून देव-दिवाळीही झाली, तरी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या १ लाख १२ हजार ०८१ बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. पैसे का मिळा
सोलापूर : अतिवृष्टी- महापुरातील बाधितांमधील अद्याप एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित


सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराला आता दोन महिने उलटले. दिवाळीही संपून देव-दिवाळीही झाली, तरी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या १ लाख १२ हजार ०८१ बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. पैसे का मिळाले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. हीच समस्या सर्व बाधित शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

सप्टेंबर अखेरीस झालेली अतिवृष्टी व महापुरातील बाधितांना दिवाळीपूर्वी व दिवाळीमध्ये मदतीचे पैसे देण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ७८० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५८४ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मदत वाटपाची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, अशीच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही जवळपास एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande