कोल्हापूर - रिंग रोड येथे हिंदू एकता आंदोलन शाखेचे उद्घाटन
कोल्हापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) फुलेवाडी नाका रिंग रोड येथील भगवा चौकात हिंदू एकता आंदोलन शाखेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंग
हिंदू एकता आंदोलन शाखेचे उदघाटन


कोल्हापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) फुलेवाडी नाका रिंग रोड येथील भगवा चौकात हिंदू एकता आंदोलन शाखेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवित कार्यक्रमाला उत्साहपूर्ण स्वरूप दिले. संयोजक वैभव कवडे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत केले.

या वेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले की,“हिंदू एकता आंदोलन कोल्हापूरकडून शहरात शाखा विस्ताराचा धडाका सुरू असून तरुण पिढी या संघटनेकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. कसल्याही अपेक्षा न ठेवता हिंदुत्वासाठी प्रामाणिक व रोखठोक पद्धतीने सुरू असलेल्या कार्यामुळे तरुण वर्ग स्वतःहून संपर्क साधत आहे आणि आपल्या परिसरात शाखा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. हा संघटनेच्या कार्याचा सकारात्मक परिणाम आहे.”

शाखा उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला बाबू साखळकर, ओंकार बॉंद्रे मानसिंग पाटील ,रिंकू देसाई, अमोल पालोजी, सुनील वाडकर, राजू यादव, हिंदुराव शेळके, वैभव कवडे, राज पेंडुंरकर, करण पाटील स्वयम केरुरे यश पोवार ओंकार कांबळे,जयवंत खतकर वंदनाताई बोंबलवाड,प्रथमेश माने, विवेक भोगम, प्रसाद आडसुळे, आनंदराव कवडे, अजित तोडकर, सुधारक वडगावकर, नंदकुमार आहीर यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande