
सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामास आता गती येणार आहे. पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केलेल्या मागणीस सकारात्मता दाखवत 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली,असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 25 लाख रुपयांचा निधी यापूर्वी दिला होता, मात्र चबुतरा नव्याने करावयाचे असल्याने व इतर सुशोभीकरण कामे,तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था करण्यासाठी निधी नसल्याने अनेक दिवसांपासून काम प्रलंबित होते. ही बाब भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांना बसवेश्वर सर्कलचे सागर अतनुरे, गुरुराज पद्मगोंडा यांनी निदर्शनास आणून दिली. यानंतर अक्षय अंजिखाने यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सदर कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड