कोल्हापूरात रंगलाय महायुतीतील मंत्री, नेत्यांच्यातच कलगीतुरा
कोल्हापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,'' असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षासह नेते आणि अर्थमंत्री असलेल्या
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे नेते


कोल्हापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,' असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षासह नेते आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यानांच लक्ष्य केले. परंतु, कागलसह मुरगूड व गडहिंग्लजचा आमदार मीच आहे, या तिन्ही शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वांगीण विकास आपणच करणार आहोत, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. कागल तालुक्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल नगर परिषदांच्या निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांच्यात एकमेकांच्या विरोधात कलगीतुरा रंगला आहे.

कागल तालुक्यात मुश्रीफ-घाटगे आघाडीतून दोन्ही राष्ट्रवादीची एकी तर त्यांच्याच विरोधात शिवसेना शिंदे गटाचे मंडलिक-आबिटकर, उभे ठाकले आहेत आणि त्यानां साथ देण्यासाठी भाजपचे नेते असलेले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात येऊन मुरगुडमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून मंडलिक-आबिटकर गटासाठी प्रचार सभा घेऊन राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

कोणी कितीही देव पाण्यात घातले तरी आमचे सरकार हे अजून चार वर्षे टिकेलच. त्यामुळे निधीची कसलीही कमतरता भासणार नाही. तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,' असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मुरगूड येथील अंबाबाई मंदिरासमोर शिवसेना-भाजपच्या प्रचारप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, 'गोकुळ'चे संचालक अमरिश घाटगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, 'मुरगूडनगरीचा सर्वांगीण विकास साधून स्वप्नातील नवे शहर बनवण्यासाठी साथ द्या.' माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, 'मुरगूड शहराच्या विकासासाठी मिळालेल्या ७० कोटी रुपयांच्या विकास निधीमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून निधी दिला. मुरगूडला महाराष्ट्रातील अव्वल नगरी बनवूया. केंद्र व राज्यात आपलेच सरकार असल्याने निधी कमी पडू देणार नाही. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुहासिनीदेवी पाटील यांचेही भाषण झाले.

स्वागत दिग्विजय पाटील यांनी केले. आभार अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी मानले. यावेळी परशुराम तावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, भूषण पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंगराव भोसले, शिवाजी चौगले, संभाजी आंगज आदी उपस्थित होते

राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे असे आम्ही म्हटल्यानंतर तिजोरीचे मालक आम्ही आहोत असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, कागलसह मुरगूड व गडहिंग्लजचा आमदार मीच आहे, या तिन्ही शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वांगीण विकास आपणच करणार आहोत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

गेली २० वर्षे मी गडहिंग्लजचा आमदार आहे. त्यामुळे येथील लोकांची माझी चांगली ओळख आहे, शहरातील प्रश्नांची मला माहिती आहे. त्या सर्व प्रश्नांची निर्गत माझ्या हातूनच व्हावी, यासाठी शहरातील जनता आसुसलेली आहे. आतापर्यंत ज्यांच्याकडे नगरपालिकेची सत्ता होती, त्यांनी काय केले ? हेही लोकांना माहीत आहे. त्यामुळे तत्त्वाला तिलांजली देऊन युती केलेला जनता दल संधीसाधू की आम्ही हे सूज्ञ जनतेला चांगलेच ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आपला पारंपरिक विरोधक राहिलेल्या जनता दलाच्या बदललेल्या भूमिकेकडे बोट दाखवत

मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू ग्रुप'चे प्रमुख समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून आम्ही कागल पालिकेची निवडणूक लढवत आहोत. शक्य तिथे महायुती म्हणून आणि शक्य नाही तिथे आघाडी करून निवडणुकीला सामोरे जायचे, एकमेकांत भांडण करायचे नाही, असे आमचे राज्यपातळीवरच ठरले आहे.

राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे असे आम्ही म्हटल्यानंतर तिजोरीचे मालक आम्ही आहोत असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, कागलसह मुरगूड व गडहिंग्लजचा आमदार मीच आहे, या तिन्ही शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वांगीण विकास आपणच करणार आहोत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande