नाशिक : उबाठाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू
नाशिक, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। मनमाड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच एक दुःखद घटना घडली असून प्रभाग क्रमांक 10 अ मधील उबाठा शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उ
मनमाडला उबाठाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा हार्ट अटॅक ने झाला मृत्यू


नाशिक, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। मनमाड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच एक दुःखद घटना घडली असून प्रभाग क्रमांक 10 अ मधील उबाठा शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाघमारे यांनी प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली होती मात्र रात्री झोपेत त्यांना हृदय विकाराचा जोरदार धक्का बसुन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नितीन वाघमारे यांच्या निधनाने वार्ड प्रभाग क्रमांक 10 अ मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूकीच्या ताणतणावाणे 34 वर्षीय नितीनचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग 10 मधील उमेदवार असलेले नितीन वाघमारे यांचा सोमवारी मध्यरात्री झोपेत हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नितीन हा अत्यंत मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावाचा तरुण होता त्याच्या अकस्मात मृत्युने सर्वाचे डोळे पानवले असुन या निवडणुकीत तो उमेदवार देखील होता.

निवडणुकीच्या टेंशनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. नितीनच्या मृत्युची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली शहरातील सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना यासह इतर क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन या घटबेबात दुःख व्यक्त केले.नितिन यांच्यावर आज अलोट गर्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले.

प्रभाग 10 मधील निवडणूक थांबणार का...?

सध्या मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक सुरू असुन या निवडणुकीत प्रभाग 10 अ मधून नितीन वाघमारे उमेदवारी करत होते मात्र त्यांच्या अकस्मात मृत्यूने ही निवडणूक होईल की नाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभ्यास करत असुन याबाबत उद्या निर्णय देणे अपेक्षित आहे यामुळे प्रभाग 10 मधील निवडणूक होईल की थांबेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande