
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा खुलताबाद येथे संपन्न होणार असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यात येत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मराठवाडा दौरा करणार आहेत. छत्रपती संभाजीी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत जाहीर सभेत ते भाषण करणार आहेत त्यापूर्वी
सभेच्या स्थळाची पाहणी मंत्री सावे यांनी केली.भारतीय जनता पक्षाला नगरपालिकेत निश्चित यश मिळेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा महत्त्वाची असल्याचे सावे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis