बीड : पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्ष पदावर विराजमान होणारच - पंकजा मुंडे
बीड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ येथील नगरपरिषद निवडणूकीत यंदा महायुती इतिहास घडविणार आहे, पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील यात तीळमात्र शंका नाही. असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्वाही दिली. परळी वैजनाथ नगर परि
पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील


बीड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ येथील नगरपरिषद निवडणूकीत यंदा महायुती इतिहास घडविणार आहे, पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील यात तीळमात्र शंका नाही. असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्वाही दिली.

परळी वैजनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नाव परळीपासून वेगळे होऊ शकणार नाही, एवढे काम त्यांनी केलेले आहे. आमदार असताना मी नगरोत्थानचा निधी आणला, त्यातुन अनेक विकास कामे मला करता आली याचा उल्लेख त्यांनी केला.आता मंत्री झाल्यावर पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी मंजूर केले. फक्त आणि फक्त शहराचा विकास करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. विजय आपलाच आहे, कार्यकर्त्यांनी एकजूट होवून महायुतीला विजयी करण्यासाठी कसून मेहनत घ्यावी असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande