
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - मंगळवेढा तालुक्यातील पावसामुळे बाधित झालेल्या व नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्याचे पंचनामे करण्यासह मका पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करावे या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेनेच निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे न्याय मागितला. याबाबत मागणीची निवेदन निवासी नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.
यावेळी शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, शेतकरी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गेजगे,जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जाधव ,जिल्हा संघटक राजकुमार स्वामी, मारुती वाघमारे, बालाजी धनवे, सुरेश वाघमोडे, अमोगसिद्ध काकणकी,चेतन वाघमोड, मधुकर कोटे, कृष्णा सोमूत्ते,विठ्ठल पडवळे,नवनाथ सिरसटकर,युवराज म्हेत्रे,महेश तळ्ळे,अजित टकले, बबन मुंगसे,बाबा इनामदार, ग्रामपंचायत सदस्य चणवीर लंगोटे, नागनाथ म्हमाने, दत्तात्रय कोरे,दादा तुकाराम बंडगर,कल्पेश मोटे,बाळासाहेब डांगे, सुरेश डांगे, दादा मोठे, तानाजी डांगे.भरमु काळे,आदी उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात संततधार आणि जोरदार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करताना ठराविक दिवसाचा अवधी दिल्यामुळे काही शेतकरी अजून वंचित राहिले आहेत त्या वंचित शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करताना तलाठ्याने कमी नुकसान दाखवून त्यांच्यावर अन्याय केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड