
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - नगरपालिकेच्या आखाड्यात तब्बल आठ माजी नगरसेवकांनी पुन्हा नगरपालिकेत जाण्यासाठीचा चंग बांधला असून त्यासाठी काहींनी पक्षाचा झेंडा बदलला मात्र माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांनी पुन्हा घड्याळ चिन्ह घेऊन आखाड्यात उतरले एकमेव उमेदवार ठरले. सध्या मतदाराची मनधरणी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मागील नगरपालिका निवडणुकीच्या वेळी स्व. भारत भालके काँग्रेसकडून आमदार होते त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत जागा वाटपात काही समर्थकांना काँग्रेस तर काही समर्थकांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. सध्या तालुक्याची राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सलग दोन टर्म आ.समाधान आवताडे भारतीय जनता पार्टीकडून आमदार झाल्यामुळे साहजिकच तालुक्याच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पार्टीचा धबधबा वाढल्यामुळे नगरपालिकेच्या 21 जागांपैकी 17 जागा या भारतीय जनता पार्टी कडून लढवल्या जात आहेत तर चार जागा मित्रपक्ष राष्ट्रवादीला देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड