अमरावतीत उमेदवारांकडून पहाटेच 'जनसंपर्क मोहीम' सुरू
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.) नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय शहरातील हालचालींना वेग आला असून प्रचाराची दिशा आणि पद्धती यामध्येही बदल दिसू लागला आहे. पारंपरिक घरदारी प्रचार व दुपारच्या सभा यांच्या तुलनेत उमेदवारांनी आता मॉर्निंग वॉकला नवे मा
मॉर्निंग वॉक झाला प्रचाराचे नवे व्यासपीठ उमेदवारांकडून पहाटेच 'जनसंपर्क मोहीम' सुरू


अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.) नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय शहरातील हालचालींना वेग आला असून प्रचाराची दिशा आणि पद्धती यामध्येही बदल दिसू लागला आहे. पारंपरिक घरदारी प्रचार व दुपारच्या सभा यांच्या तुलनेत उमेदवारांनी आता मॉर्निंग वॉकला नवे माध्यम म्हणून स्वीकारले आहे. पहाटेपासून शहरातील उद्याने, मैदाने आणि प्रमुख चौकांत फिरत मतदारांशी संवाद साधणारे अनेक इच्छुक उमेदवार दिसत असून या नव्या प्रयोगामुळे प्रचाराला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. मॉर्निंग वॉक ही आरोग्यासाठी उपयुक्त सवय असली तरी त्यातून निर्माण होणारा नैसर्गिक संपर्क, निवांत वातावरण आणि प्रत्यक्ष संवादाची संधी उमेदवारांसाठी अधिक प्रभावी प्रचाराचे साधन बनू लागली आहे. हलक्या-फुलक्या वातावरणात आपल्या ओळखीपासून ते कामगिरीपर्यंत सर्व गोष्टी मतदारांसमोर मांडणे त्यांना सहज शक्य होत आहे. विशेषतः महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मॉर्निंग वॉकला सकाळी मोठी गर्दी असल्याने त्याचा फायदा घेऊन अनेक उमेदवार योजना, स्थानिक प्रश्न आणि प्रस्तावित कामांवर चर्चा करत आहेत. पारंपरिक राजकीय भाषणांऐवजी हा संवाद अधिक नैसर्गिक पद्धतीने होत असून मतदारांनाही तो रुचकर वाटत आहे. हा नवा प्रयोग किती प्रभावी ठरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande