बनावट नोटा प्रकरणात नागपूर, धुळे, मालेगाव कनेक्शन ; सूत्रधारासह तिघांना अटक
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.) मध्य प्रदेशातील भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीमध्ये चालणाऱ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन फरार आरोपींना केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा जिल्हा परिषद शाळेत
बनावट नोटा प्रकरणात नागपूर, धुळे, मालेगाव कनेक्शन ; सूत्रधारासह तिघांना अटक


अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.) मध्य प्रदेशातील भोपाळ येथील गोकुलधाम सोसायटीमध्ये चालणाऱ्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी खंडवा येथील मुख्य सूत्रधारासह तीन फरार आरोपींना केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक असून, त्याचा मूळ संबंध अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

खंडवा पोलिस अधीक्षक मनोज कुमार राय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रविवारी (२३ नोव्हेंबर) ही कारवाई केली. या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचे नेटवर्क राज्यातील अनेक भागांत पसरले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य सूत्रधार डॉ. प्रतीक सुरेश नवलाखे (ब-हाणपूर), गोपाल ऊर्फ राहुल मांगीलाल पनवार (३५, हरदा), प्रभारी मुख्याध्यापक दिनेश दीपक गोरे (४३, रा. साईनगर, धारणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.अटक झालेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान जेलमध्ये झालेल्या ओळखीमुळेच या गोरखधंद्यात सहभागी झाल्याचे सांगितले. भोपाळ येथे नकली नोटा छापल्या जात होत्या. होशंगाबाद रस्त्यावर ते फूड अँड ट्रॅव्हल्स नामक कंपनी चालवत होते. त्याच्याआड हा गोरखधंदा सुरू होता.प्राथमिक तपासात आतापर्यंत ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचे आरोपीने सांगितले असून, तपासादरम्यान खरी रक्कम पुढे येणार आहे. पूर्वी ५० रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्य आरोपी प्रतीक नवलाखे हा नागपूर, धुळे, मालेगाव, जळगाव, चंद्रपूर, मूर्तिजापूर, धारणी येथून मौलाना याच्यामार्फत पार्ट्या शोधून त्यांना नोटा देण्याचे काम करत होता. राज्यातील नागपूर, धुळे, मालेगाव, जळगाव, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व धारणी येथे बनावट नोटा पाठवित असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

मुख्य आरोपी प्रतीक नवलाखे याला नकली नोटा प्रकरणात जळगाव भुसावळमध्ये पकडण्यात आले होते.तपासणीदरम्यान त्याच्याजवळून पाचशे रुपयांच्या १३ बनावट नोटा, सात मोबाइल, एक लॅपटॉप, ड्रायर मशीन, ३५ एटीएम कार्ड जप्त केली होती. गोपाल पनवारकडून पाचशेच्या सहा नकली नोटा, तर धारणी जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनेश दीपक गोरे याच्याजवळून १७ नकली नोटा असा एकूण १९ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.मुख्य आरोपी प्रतीक नवलाखेची बऱ्हाणपूर व त्याच्याच गावातील नईमसोबत ओळख झाली. सोबत अमरावतीच्या वसीमसोबत सुद्धा ओळख झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या वसीमच्या माध्यमातूनच जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनेश गोरे याची ओळख झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande