
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नवले पूल जवळच्या सेवा रस्त्याचे विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे.दुचाकी आणि तीनचाकी चालकांना आता पुलावर येण्याची आवश्यकता भासणार नाही. परिणामी नवले पुलावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.
नवले पूल येथील सेवा रस्ता पूर्वी दोन मार्गिकेचे होता, तो आता ३.५ मीटर वाढविला आहे.त्यामुळे रस्ता १०.५ मीटरचा झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेवा रस्त्यावरून होणारी वाहतूक तुलनेने अधिक सुरळीत होईल. तसेच, अशा वाहनांना आता नवले पुलावर येण्याची आवश्यकता भासणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार ते पाच दिवसांत अतिरिक्त मार्गिका सुरू केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु