पीएमपी चालक-वाहकांना आता वॉकीटॉकी
पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी बंद पडलेली वायरलेस (वॉकी-टॉकी) यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रस्त्यात बस बेकडाऊन झाल्यास किंवा अन्य कोणत
पीएमपी चालक-वाहकांना आता वॉकीटॉकी


पुणे, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) - पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी बंद पडलेली वायरलेस (वॉकी-टॉकी) यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रस्त्यात बस बेकडाऊन झाल्यास किंवा अन्य कोणतीही अडचण आल्यास पीएमपीच्या चालक-वाहकाला शहरात कोठेही तातडीने मदत पुरवता येणार आहे. ही यंत्रणा पोलिस स्टाईल कम्युनिकेशन करणारी असणार असून, लवकरच प्रत्येक चालक-वाहकाकडे ‌‘वॉकी-टॉकी‌’ पाहायला मिळणार आहे.

पीएमपीला वारंवार येणाऱ्या कम्युनिकेशन गॅपच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पीएमपीच्या बसमध्ये वॉकी-टॉकी बसवून कंट्रोल रूमशी थेट संपर्क साधणे चालक-वाहकांना आता शक्य होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande