परभणी - पोलिस क्रीडा स्पर्धेचा होणार समारोप
परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्राच्या वतीने आयोजित 30 व्या नांदेड पोलिस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा परभणी येथील पोलिस मुख्यालय मैदानावर पार पडणार आहे. या समारोप सोहळ्यास नांदेड परिक्षेत्राचे पोल
परभणी - पोलिस क्रीडा स्पर्धेचा होणार समारोप


परभणी, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्राच्या वतीने आयोजित 30 व्या नांदेड पोलिस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा परभणी येथील पोलिस मुख्यालय मैदानावर पार पडणार आहे.

या समारोप सोहळ्यास नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे प्रमुख उपस्थित राहणार असून विविध क्रीडा प्रकारांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता फन फेअर मानवंदनेने होणार असून त्यानंतर महिला व पुरुष गटातील 100 मीटर धावण्याची अंतिम स्पर्धा रंगणार आहे. यावेळी आमंत्रित नागरिक व पोलिस अधिकारी यांच्यातील रस्सीखेच स्पर्धेला देखील विशेष रंगत येणार आहे.

त्यानंतर मानवंदना व स्पर्धकांचे संचलन होईल. समारोपानंतर विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी व अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande