छ. संभाजीनगरात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा
आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा ४ डिसेंबर २०२५ पर्यंत र
छ. संभाजीनगरात  पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा


आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा ४ डिसेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे.

सदरील मोहिमेचे घोषवाक्य -’ स्वस्थ व आनंदी कुंटूंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातुनच साकार ’ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा पंधरवडा दोन टप्प्या मध्ये होणार आहे. पहिल्या टप्पा - संपर्क आठवडा कालावधी २७ नोव्हेंबर २०२५. दुसरा टप्पा - सेवा आठवडा कालावधी दि.२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५. पहिल्या टप्प्यात पुरुष नसबंदी बाबत जनजागृती करणे, जनतेला पुरुष नसबंदीचे महत्व सांगुन प्रवृत्त करणे, कुंटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही केवळ स्त्रिची जबाबदारी नसुन पुरुषांची सुध्दा आहे, याबाबत समुपदेशन करणे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा सोपी व सुलभ असल्याबाबत माहिती देणे व योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करुन त्यांना संपर्क साधणे व पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस प्रवृत्त करणे. दुस-या टप्प्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित करुन शस्त्रक्रिया करणे. मोफत सेवा देवुन प्रती एक पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया लाभार्थ्यांस १४५१/- रु. प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा या मोहिमेत जास्तीत जास्त पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करुन घ्यावी. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande