
सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळावरून सोलापूर ते मुंबई, सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली असून, या विमानेसेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. परंतु होटगी रोडवरील विमानतळ परिसरात मांस दुकानांमुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विविध पक्ष्यांचा अडथळा निर्माण झाल्याने विमानतळ परिसरातील मांस दुकानांवर शासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. दर पंधरा दिवसांनी या परिसरातील मांस विक्री दुकानांची तपासणी करून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
विमानतळ परिसरात मांस विक्रीमुळे मांस तुकडे खाण्यासाठी पक्षी आकाशात घिरटे घालत आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने नियमांची कडक अमंलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड