
नांदेड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” शासन निर्णय परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 नुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व शासकीय विभागाचे कार्यालयात, महाविद्यालये, शाळा, वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे कार्यालय, महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशीत केले आहे.
बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासुन शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहु संविधान प्रभातफेरीमध्ये सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis