पुणे - पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
पुणे, 25 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २२ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक
पुणे - पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली


पुणे, 25 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २२ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) आठ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केली होती. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील आठ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक देखील सीटीईटी परीक्षा देत असतात. शिक्षकांना ही सीटीईटी परीक्षा देता यावी, तसेच शिक्षक ही परीक्षा देत असल्यास शिष्यवृत्ती परीक्षेच्या आयोजनात गैरसोय होऊ नये, यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्याप्रमाणे, आता राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande