नाशिक : निवडणूक यादीतील गोंधळावरून उबाठा शिवसेनेचा बहिष्कार घालण्याचा इशारा
नाशिक, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी मध्ये दुबार नावांची संख्या साडेतीन लाख असल्याचा आरोप शिवसेनेने (उबाठा) केला आहे. या हरकतींसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणी सह मतदार यादींची पडताळणी
नाशिक : निवडणूक यादीतील गोंधळावरून उबाठा शिवसेनेचा बहिष्कार घालण्याचा इशारा


नाशिक, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी मध्ये दुबार नावांची संख्या साडेतीन लाख असल्याचा आरोप शिवसेनेने (उबाठा) केला आहे. या हरकतींसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणी सह मतदार यादींची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. असा आरोप मनसेसह शिवसेना (उबाठा) गटाकडून करण्यात आला. मतदार यादी मध्ये दुबार व मयत नावे आहेत. तर प्रभाग बदल आणि हेतू पुरस्कार गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन लाख ५३ हजार दुबार मतदार नोंदविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

महापालिका प्रशासनाने दुबार नावाचा आकडा ८६ हजार ६८८ सांगितला आहे. मात्र सदरचा आकडा चुकीचा आहे. प्रारूप मतदार यादीत १९९२ पासून मृत झालेल्या हजारो नागरिकांची नावे अद्यापही आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये ३०० ते ४०० मयत नावे असून काही प्रभागांमध्ये एक हजार पेक्षा जास्त नावे आहेत. जन्ममृत्यूची नोंदणी महापालिकेकडे असतानाही एवढी नावे मतदार याद्यांमध्ये कशी आली? असा सवाल करण्यात आला आहे.

जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते माजी आमदार वसंत गीते, जिल्हा सचिव मसूद जिलानी, महिला जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, हेमंत गायकवाड, यांनी मुख्य व लेखा वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांना निवेदन दिले. हरकतींसाठी मुदतवाढ देण्याची देखील मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्य निवडणूक आयोग विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande