सोलापूर - विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद पाहता तिकिटाच्या दरातही वाढ
सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद पाहता तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबईसाठी कंपनीने ३५०० रुपये दर असताना प्रत्यक्षात ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. गोव्यासाठीही २ हजार तिकिट असताना
Airport Solapur Today


सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात विमानसेवेस मिळणारा प्रतिसाद पाहता तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबईसाठी कंपनीने ३५०० रुपये दर असताना प्रत्यक्षात ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. गोव्यासाठीही २ हजार तिकिट असताना २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत तिकिट दर पोचले आहेत.

पुढील तीन महिने गोव्यासाठी ९८ टक्के तर मुंबईसाठी ४० ते ६० टक्के बुकिंग झाले आहे. दोन्ही शहरासाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता जानेवारी महिन्यात आणखी तिकिट दर वाढण्याचा अंदाज आहे.मुंबई-सोलापूर-मुंबई विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यासाठी ४० ते ६० टक्के बुकिंग झाले आहे. २५ टक्के बुकिंग हे कंपनीकडून होत आहे. डिसेंबर महिन्यात मोजके काही दिवस सोडल्यास ५० टक्के तर जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे ४० टक्के तिकिट बुकिंग झाले आहे. प्रतिसाद वाढल्याने तिकिटाच्या दरातही वाढ झाली आहे. ३५०० रुपये तिकिट असताना हे तिकिट चार हजार रुपयांच्या वर गेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande