साेलापुर - संभाजी ब्रिगेडचे पार्क चौकात आंदोलन
सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे बालिकेवर अत्याचार करून खुनाच्या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. खैरनार नावाच्या नराधमाने शारीरिक अत्याचार करून ही हत्या केली.या घटनेच्या निषे
साेलापुर - संभाजी ब्रिगेडचे पार्क चौकात आंदोलन


सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे बालिकेवर अत्याचार करून खुनाच्या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. खैरनार नावाच्या नराधमाने शारीरिक अत्याचार करून ही हत्या केली.या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने पार्क चौकात आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी आरोपीच्या छायाचित्रावर दगड मारून प्रतिकात्मक आंदोलन केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, गणेश कदम, शेखर भोसले, सिद्धाराम सावळे, सतीश वावरे, संतोष सुरवसे, बबन माने, संजीवनी सलबत्ते, मनीषा कोळी, पूजा कलागाते, राधा घुले, सुनंदा सूर्यवंशी आदी उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande