खोपोलीत तटकरे यांची धाव—परिवर्तन विकास आघाडीला “राजकीय ऑक्सिजन
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.) रायगडच्या राजकारणात तापमान वाढवणारी चाल करत खा. सुनील तटकरे खोपोलीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. अगदी धावत्या भेटीत त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारांना बळ दिले, त्यावरून एक गोष्ट स्पष
खोपोलीत तटकरे यांची धाव—परिवर्तन विकास आघाडीला “राजकीय ऑक्सिजन”; प्रतिस्पर्ध्यांचे चक्रावलेले चेहरे


रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.) रायगडच्या राजकारणात तापमान वाढवणारी चाल करत खा. सुनील तटकरे खोपोलीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. अगदी धावत्या भेटीत त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारांना बळ दिले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली — खोपोलीची निवडणूक आता थेट तटकरे यांच्या नजरेत आहे आणि ज्यांच्या अंगणात ते उतरत आहेत, तिथे राजकीय समीकरणे बदलणार हे नक्की.

परिवर्तन विकास आघाडीच्या तंबूत तटकरे पोहोचताच वातावरणात उत्साह उसळला. काही उमेदवार तर सरळ म्हणाले —

तटकरे साहेब आले म्हणजे अर्धा विजय पक्का!

अर्थात, राजकारणात हे वाक्य अनेकदा ऐकायला येते, पण या वेळी जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहता त्यात थोडे सत्य असल्याचे जाणवले.

तटकरे यांनी या दौऱ्यात विरोधकांवर थेट हल्ला चढवला नसला तरी विकासाच्या नावावर त्यांनी असा संदेश दिला की कोणालाही समजायला वेळ लागला नाही की बाण कोणावर सोडला आहे.

त्यांचे स्पष्ट म्हणणे —

जिल्ह्याच्या विकासाला अडथळा आणणाऱ्यांना जनता आता उत्तर देईल. ही ओळ ऐकल्यावर उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू —

“ही लाइन तर काही लोकांच्या कानाला टोचणार नक्की!” राजकीय विश्लेषकांनीही तटकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व दिले आहे. त्यांच्यानुसार,

“ही फक्त भेट नव्हे; हा ताकद दाखवण्याचा राजकीय इशारा आहे.” परिवर्तन विकास आघाडी या भेटीनंतर अधिक आक्रमक दिसत आहे. दुसरीकडे विरोधक मात्र ही भेट का, या वेळीच का? असा शोध लावत आहेत. खोपोली निवडणुकीत आता रंगत आली आहे.

तटकरे यांच्या भेटीनंतर एकच चर्चा— 'खेळ तर अजून बाकी आहे… आणि मास्टरस्ट्रोक कोणाचा?'

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande