
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)अंजनगाव शहरात सध्या लोकशाही उत्साहाची जोरदार तयारी सुरू आहे.या लोकशाही उत्साहात युवा वर्गापासून ते वय वृद्ध पर्यंत सहभागी होत आहे.शहरात लोकशाही उत्साहात तीन ठिकाणी चांगलीच गर्दी पाहिला मिळत आहे. लोकशाही चर्चा म्हटली की यात सर्वच हौशी गवशी या चर्चेत सहभागी होतात. दिल्ली पासून ते गल्ली प्रयत्न ज्यांना राजकारणाचा गंधही नाही तेही या लोकशाही उत्साहात सहभागी होऊन लोकशाही उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात. अंजनगाव शहरात लोकशाही उत्सव साजरा करण्याचे तीन पाॅईट चांगलेच चर्चेत असुन सध्या या पाॅईट वर गर्दी पाहिला मिळत आहे . शहरातील या पाॅईट वरुन राजकीय घडामोडीची चर्चा ऐकण्यासाठी शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक या तीन पाॅईट वर चर्चा ऐकण्यासाठी भेट देत आहे. जुने बस स्थानक येथिल चंदू ढोरे यांच्या पानटपरी वरुन ते शहरातील मध्यभागी असलेल्या चावडी चौकातील ललित व्यास ( डाला ) पान टपरी ते शहरांच्या बाहेर एकांतात असलेली शाम बर्वे यांच्या चहा कॅन्टीन वर राजकीय घडामोडीची चाय पे चर्चा ऐकायला मिळते.तर लोकशाही उत्साहामुळे या तीन्ही चहा पान टपरी वाल्यांना सध्या लोकशाही उत्साहामुळे व्यवसायात सुगीचे दिवस आले आहेत.
पान टपरी वाले उमेदवारांचे गणित काढण्यात माहीरशहरातील प्रभागात कोणत्या समाजांची संख्या जास्त आहे धार्मिक संख्या शहरात किती आहे शहरातील एकूण मतदार संख्या याबाबत पानटपरी व्यवसायीक असलेलें चंदु ढोरे व ललित व्यास यांच्या मुखपाठ आकडेवारी आहे मागिल निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जातीनिहाय व धर्माचे मतदान झाले याबाबत माहिती आहे.प्रत्येक प्रभागात कोण निवडून येणार कोणत्या उमेदवारांची टक्कर होणार याबाबत उमेदवारांचा आकडेवारीचा हिशोब करुन गणित काढतात. त्यामुळे यांना राजकीय गणित काढण्यात माहीर समजल्या जाते.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी