पर्यटन मंत्र्यांची माथेरानला भेट; विकास आराखड्यांना मिळणार ‘टर्बो’ गती
रायगड, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। माथेरान नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा ताकदप्रदर्शनाचा कार्यक्रम करत वातावरण तापवले. पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत विकास, सत्ता आणि राजकीय गणितांचा त्रिकोणी संग
पर्यटन मंत्र्यांची माथेरानला भेट; विकास आराखड्यांना मिळणार ‘टर्बो’ गती


रायगड, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। माथेरान नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा ताकदप्रदर्शनाचा कार्यक्रम करत वातावरण तापवले. पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत विकास, सत्ता आणि राजकीय गणितांचा त्रिकोणी संगम पाहायला मिळाला. मंत्री देसाई यांनी स्पष्टपणे जाहीर केले की “माथेरानचा विकास हा माझ्या विशेष प्राधान्यक्रमात आहे; पर्यटक, स्थानिक आणि निसर्ग— तिघांच्याही हिताला पूरक अशी प्रकल्पयोजना सुरू होणार आहे.”

सभेत सर्वाधिक चर्चा झाली ती मंत्र्यांनी माथेरानला दिलेल्या विकासाच्या ‘भोपळ्याची’— म्हणजे निसर्ग पर्यटन, ट्रॅकिंग मार्ग, शाश्वत सुविधा आणि पर्यटक व्यवस्थापनासाठी निधी व धोरणात्मक मदतीची हमी. याबरोबरच मंत्री देसाई यांनी महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देताना खणखणीत संदेश दिला— “मनोज खेडकर–चंद्रकांत चौधरी ही जोडी टिकली पाहिजे; जिंकूनही एकता गेली तर विकासाचा गाडी रुळावरून जाईल.”

सभेत आमदार महेंद्र थोरवे यांनीही आक्रमक भूमिका घेत, माथेरानमधील विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. “माथेरान नगरपरिषद औरंग्याच्या छावणीत जाऊ देऊ नका,” असा घणाघात करत त्यांनी मतदारांना एकदिलाने मतदान करण्याचे आवाहन केले. थोरवे यांचे हे विधान स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले असून, यामध्ये त्यांनी विरोधी पॅनेलवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसून आले.

पक्षांतर्गत एकता टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या सभेत महायुतीने दोन संदेश दिले—

विकासाचा रोडमॅप स्पष्ट आहे, आणि

माथेरानमध्ये निसर्ग पर्यटन वाढत असताना, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक निर्बंध, स्वच्छता आणि पर्यटक व्यवस्थापन या पाच प्रमुख प्रश्नांवर सरकारकडून प्रत्यक्ष हालचाल होणार असल्याचे वातावरण सभेनंतर निर्माण झाले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची ही सभा महायुतीला उर्जा देणारी ठरली असून, स्थानिक राजकारणात या भाषणांचे पडसाद पुढील काही दिवस उमटतील, यात शंका नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande