विकासाचे व्हिजन ठेवून उमेदवार निवडणूक रिंगणात - खा. धैर्यशील मोहिते पाटील
सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। अकलूजचा शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात विकास साधला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचे एक व्हिजन ठेवून निवडणुकीत उतरला आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्येने विजयी करा असे आ
विकासाचे व्हिजन ठेवून उमेदवार निवडणूक रिंगणात - खा. धैर्यशील मोहिते पाटील


सोलापूर, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। अकलूजचा शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात विकास साधला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचे एक व्हिजन ठेवून निवडणुकीत उतरला आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्येने विजयी करा असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ पाटील वाड्यात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, शिवसेनेचे संभाजी शिंदे, नामदेव वाघमारे, स्वप्निल वाघमारे आदी उपस्थित होते.

खासदार मोहिते पाटील म्हणाले अकलूज ग्रामपंचायतीचा राज्यभरात इतर कोणत्याही ग्रामपंचायतपेक्षा चांगला विकास साधला आहे. मोहिते पाटलांनी अनेकांच्या आजारात मदत केली मात्र त्याचा कधी गवगवा केला नाही.तसे करून त्यांच्या दुःखाची खपली काढायची नाही. अकलूजकरांसाठी आपल्यावर झालेली टीका सहन करू मात्र अकलूजकरांवर जाणार असाल तर सोडणार नाही असा इशाराही मोहिते पाटील यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande