रत्नागिरी : देवरूखच्या विलास रहाटेंची रांगोळी मुंबई विद्यापीठात लक्षवेधी
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) | मुंबई विद्यापीठा मध्ये ''नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशनने (एनबीए)'' महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित केलेल्या आउटकम बेस्ड् एज्युकेशन अँड अ‍ॅक्रिडिटेशन कार्यशाळेसाठी देवरूखचे विश्वविक्रमी रां
रत्नागिरी : देवरूखच्या विलास रहाटेंची रांगोळी मुंबई विद्यापीठात लक्षवेधी


रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) | मुंबई विद्यापीठा मध्ये 'नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशनने (एनबीए)' महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आयोजित केलेल्या आउटकम बेस्ड् एज्युकेशन अँड अ‍ॅक्रिडिटेशन कार्यशाळेसाठी देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी लक्षवेधी ठरली.

चित्रासारखी दिसायला साधी व सोपी, परंतु आकर्षक वाटणारी ही रांगोळी साकारायला कठीण असते. या रांगोळीत शुभ्र सनमायकासारख्या पृष्ठभागावर असणाऱ्या रंगाचा वापर करण्यात आला असून, यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, एनबीए, दिल्ली व मुंबई विद्यापीठ अशा तीन लोगोंसह राजाबाई टॉवरची छोटी व सुबक प्रतिकृती आणि यासोबतच्या उत्तम सुलेखनाने दर्शकांचे लक्ष वेधले.

रहाटे यांच्या या आशयपूर्ण रांगोळी कलाकृतीचे अनेक मान्यवरांनी कौतुक करून शाबासकी दिली. या वर्कशॉपचे आयोजन एन. बी. ए. तंत्र शिक्षण संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाने संयुक्तपणे केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande