संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकाच्या जागेसाठी निवड करा - आशिष शेलार
मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मौजे पराड येथे स्मारक उभारणी करण्यात येणार आहे. याकामी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठी
मुंबई


मुंबई, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मौजे पराड येथे स्मारक उभारणी करण्यात येणार आहे. याकामी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने पुढील सात-आठ दिवसांत जागा निवडीचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे पराड येथे संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे स्मारक उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तर दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राममोहन पाठक उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर हे निर्भिड, समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रेरणास्थान असून आजही हिंदी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सर्वोच्च मानले जाते. काशी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर हे कोकणातले सुपुत्र असल्याने त्याचे स्मारक तसेच त्यांचे जीवनदर्शन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यादृष्टीन त्यांच्या मूळगावी स्मारक उभारण्यात येत आहे. हे स्मारक उभारणीसाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या नियुक्त समितीने संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी जागेची निश्चिती तसेच मोजणी करून त्या ठिकाणी स्मारकाबरोबरच गावकऱ्यांच्या अनुषंगीक मागणीचा विचार करावा. याकामी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सात-आठ दिवसात निर्णय घेऊन तत्काळ अहवाल पाठवावा असे निर्देशही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande