सोलापूर - पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू जागेवरच सडल्या
सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक उपनगरांतील हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. घरातील भांडी, धान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले. अशा परिस्थितीत शासनाने
सोलापूर - पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू जागेवरच सडल्या


सोलापूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक उपनगरांतील हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. घरातील भांडी, धान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले. अशा परिस्थितीत शासनाने ‘पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी’ दिवाळीपूर्वी विशेष रेशन किट उपलब्ध करून दिले होते. या किटचे वितरण करण्यामध्ये महसूल व महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्याने पूरग्रस्तांना वाटण्याच्या वस्तू महापालिकेत अक्षरशः जागेवरच सडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहरात सप्टेंबर महिन्यात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली होती.

शेळगी, विडी घरकूल, अक्कलकोट रोड, वसंत विहार, देशमुख-पाटील वस्ती, यश नगर या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्यामुळे हाःहाकार माजला होता. घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते. घरातील घरातील भांडी, धान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक लोक रस्त्यांवर आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande