
लातूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
तुळशी विवाह सोहळ्यास रविवार पासून सुरूवात झाली आहे . बुधवारी दि. ५ तुळशी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विवाह ठरलेल्या मंडळींची धावपळ सुरू झाली आहे. विवाह सोहळ्यासाठी यंदा तब्बल ७० तिथी असून यात नॉव्हेंबर महिन्यात सात लग्नमुहूर्त आहेत.
यंदाच्या लग्नसराईत पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत एकूण ७० मुहूर्त असून नोव्हेंबरपासून, मंगल कार्यालये बुक करण्याची घाई केली जात आहे. विवाह हंगाम सुरूह्याझाल्यामुळे विवाहासाठी लागणा-या वस्तू खरेदी करण्यासाठी वर-वधू पित्याची धावपळ सुरू झाली आहे. मोबाइलचा जमाना असला तरी अनेक जण लग्नपत्रिकांसाठी छापखान्याकडे वळू लागले आहेत. घोडेवाले, बँडवाले, आचारी, मंडप, लॉन्स, भाजीपाला, डाळी, धान्य, कापड, दागिने अशा विविध व्यवसायांना या काळात सुगीचे दिवस आले आहेत. विड्याची पाने, पत्रावळी, केळीची पाने, फुले, पुष्पगुच्छ, सुगंधी द्रव्य, उंची कापड, सोन्याच्या आभूषणापर्यंत विविध वस्तूंची पवित्र कार्यात आवश्यकता असते. या वस्तूंशी संबंधित व्यापार-उद्योगात मोठी उलाढाल या काळात होताना दिसून येणार आहे.
या महिन्यात या तारखेला विवाह मुहूर्तनोव्हेंबर २०२५: २, ३, ८, १२, १६, २२, २५, ३०, डिसेंबर २०२५ : २, ५, १२, १३, १५, जानेवारी २०२६ : २३, २४, २५, २६, २८, २९ फेब्रुवारी २०२६ : ३, ५, ७, ८, १०, ११, १२, २०, २२, २५, २६, मार्च २०२६ : १, ३, ४, ७, ८, ९, ११, १२, मे २०२६: १, ३, ५, ६, ७, ८, १३, १४, जून २०२६ : २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २९, जुलै २०२६ : १, ६, ७, ११, नोव्हेंबर २०२६ : २१, २४, २५, २६, डिसेंबर २०२६ : २, ३, ४, ५, ६, ११, १२.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis