
कॉमेडी तडका – होम मिनिस्टर खेळ पैठणीचा
जालना, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
अभिनेता ओम यादव प्रस्तुत कॉमेडी तडका “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” या विनोदी कार्यक्रमाला जालना येथे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी, पुरुष मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग भुतेकर यांनी केले होते. कार्यक्रमात हास्यरस आणि मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळाली. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आयोजक व कलाकारांचे कौतुक करत अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis