
जालना, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
नंदनवन कॉलनी येथे सार्वजनिक सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी आमदार खोतकर यांनी उपस्थित बांधवांना संबोधित करताना सांगितले की, “जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता विकास आराखडा तयार केला आहे आणि त्या दिशेने सातत्याने मार्गक्रमण करत आहे.”
यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी नंदनवन कॉलनीतील नागरिकांना दिलेला शब्द पाळत सभामंडपाच्या भूमिपूजनाची वचनपूर्ती केली.
गोकुळधाम परिसरातील रस्त्यांचे काम, पुष्पक नगर व मातोश्री कॉलनीतील रस्ते तसेच सर्व डी.पी. रोड व भूमिगत गटार विकासकामे याबाबत स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले
या प्रसंगी कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, गणेश शेठ राऊत, राहुल हिवराळे, किशोर पांगरकर, लक्ष्मण अवघड, संदीप साबळे, संतोष रासवे, शुभम देशमुख, शरद ढाकणे, राऊत मामा, प्रवीण जगताप, मेघराज चौधरी, संतोष रासवे तसेच स्थानिक परिसरातील महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis