
लातूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांचे सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व निलंगाकडे मोटारीने प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता निलंगा येथे आगमन व बारव आणि निळकंठेश्वर मंदिर भेट तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ४.३० वाजता निलंगा येथून औसाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५ वाजता औसा येथे आगमन होईल, तसेच आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी भेट व राखीव. सायंकाळी ५.३५ वाजता औसा किल्ला येथे आगमन व किल्ला पाहणी. सायंकाळी ६.०५ वाजता औसा येथील किर्तन महोत्सव स्थळी आगमन होईल व कीर्तन महोत्सवास उपस्थित राहतील. सायंकाळी ६.३० वाजता औसा येथून लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.४५ वाजता त्यांचे लातूर येथे आगमन होईल व दयानंद सभागृह येथे आयोजित संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ०७.२५ वाजता एमआयटी मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे आमदार रमेश कराड यांची भेट घेतील. रात्री ८ वाजता मजगे नगर येथे भाजप शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. रात्री ८.२० वाजता आदर्श कॉलनी येथे देवघर निवासस्थानी श्रीमती अर्चनाताई पाटील यांची भेट घेतील. रात्री ८.५० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव.
मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी ७.४५ वाजता माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार हे लातूर येथील केशवराज शाळा येथे भगवत गीता पठण कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी ८ वाजता डी मार्ट जवळील गंगासागर सोसायटी येथे आगमन व राखीव. सकाळी ८.४५ वाजता त्यांचे औसा रोडवरील गंधर्व बैंक्वेट हॉल येथे आगमन होईल व पूर्वनियोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी ९.४५ वाजता गंधर्व बँक्वेट हॉल येथून तेरकडे प्रयाण करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis