छ. संभाजीनगर : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मौजे गारज येथे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्ता मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित
प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा आणखी उंच फडकवण्याचा निर्धार


छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मौजे गारज येथे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्ता मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित राहून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

संघटन बळकट ठेवून प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा आणखी उंच फडकवण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा उत्साह, निष्ठा आणि एकजूट पाहून आगामी निवडणुकांत निश्चितच शिवसेना प्रबळ शक्ती म्हणून पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला.

तसेच माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची शिवसेना लोकसभा प्रमुख पदी आणि बाबासाहेब पाटील जगताप यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी झालेली निवड ही केवळ नियुक्ती नाही, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाचा विजय असल्याने या नियुक्तीच्या निमित्ताने त्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष साबेरभाई, कृ.उ.बा. सभापती रामहरी बापू जाधव, मा सभापती भागीनाथ दादा मगर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पा साळुंके, यांच्या विशेष उपस्थितीसह सर्व प्रमुख पदाधिकारी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, व्हाईस चेअरमन व गावकरी उपस्थित होते.

-------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande