
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)
ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस काही पडायचे नाव घेत नाही. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा या पिकांच्या पेरणीला विलंब होणार आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सततच्या पावसाने जमिनी वाफस्यावर येण्यास वेळ लागत असून मशागतीला वेळ लागत आहे. गणपती, दसरा, दिवाळीनंतरही पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे.
लांबलेल्या पावसामुळे हरभरा पेरणीला अध्यापही वेग आला नसुन थंडीत चांगले येणार्या गहु पेरणीला हि अजुन म्हणावी तशी सुरवात झाली नाही. सोयाबीनच्या खाली झालेल्या रानात सध्यस्थिती मशागत आटोपून सरा पाडुन नविन ऊस लागवडीची धामधूम ओलिताची सोय असलेल्या गावातील क्षेत्रात दिसून येत आहे. पाऊस लवकर न उघडल्यास रब्बी हंगाम अजुन लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे.बिज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करु नये ^सततच्या पावसाने जमिनीत बुरशी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकर्यांनी हरभरा, गहु व रब्बीतील ईतर पिक पेरणी करते. वेळी बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करु नये. बुरशी व मर रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत कऱण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी