दिल्ली विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक उड्डाणांना विलंब
नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय एअरपोर्ट) शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे हवाई सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला. आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) प्रणालीत तांत्रिक अडचण निर्म
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ


नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय एअरपोर्ट) शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे हवाई सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला. आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) प्रणालीत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे उड्डाण सेवा प्रभावित झाली असून अधिकारी सांगत आहेत की तांत्रिक पथक ही समस्या दूर करण्यासाठी काम करत आहे.

देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या दिल्ली विमानतळावरून दररोज सुमारे 1,500 उड्डाणे सुरू होतात. स्पाइसजेटसह अनेक विमानकंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बहुतेक उड्डाणे उशिराने सुटत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टममध्ये बिघाड झाला आहे. ही प्रणाली ऑटो ट्रॅक सिस्टीमला माहिती पुरवते, जी उड्डाणांच्या नियोजनाची देवाणघेवाण करते.या प्रणालीत बिघाड झाल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना आता उड्डाणांचे नियोजन हाताने (मॅन्युअली) तयार करावे लागत आहे, ज्यामुळे प्रक्रियेस अधिक वेळ लागत आहे. परिणामी, अनेक उड्डाणांना विलंब होत आहे. यामुळे विमानतळावर वाहतूक वाढली असून प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande