शरद पवार आणी भीमराव आंबेडकर एकाच मंचावर... मात्र आंबेडकर यांनी दिला विराम
अकोला, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे. मात्र अकोल्यातील एका कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे
प


अकोला, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे. मात्र अकोल्यातील एका कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार एकाच मंचावर दिसले, ज्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी, या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रात भविष्यात कोणते राजकीय समीकरण उदयास येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालयाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फुटी पुतळा तर 24 तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते. मात्र या नंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना भीमराव आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande