चंद्रपूर - आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन; अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत
चंद्रपूर, 8 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माह
चंद्रपूर - आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन; अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत


चंद्रपूर, 8 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा, प्रशासकीय इमारत चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन 1 डिसेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत म्हणजेच असेल. वर्ग-3 व वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी 1 ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व बँक पासबुक) छाया प्रतींसह नोंदणी फॉर्म सादर करावा. नोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 26 नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. तर निवड यादी 28 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकामार्फत शिकवले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच तसेच प्रतिमाह एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. क्र.9764580986) यांच्याशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande